Maharashtra Politics : राज्यातील सर्वात मोठी घडामोड; भाजप-शरद पवार गट एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या नाट्यमय निवडीनंतर राज्याच्या स्थानिक राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपदी छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने एकत्र भूमिका घेतल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्याबाबतही राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. (Maharashtra Politics)
यापूर्वी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू होती. मात्र, अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडीत छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. (Maharashtra Politics)
या घडामोडीनंतर भाजप आणि शरद पवार गटाने स्थानिक पातळीवर एकत्र येत निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी हा निर्णय स्थानिक नगरसेवकांचा असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Politics)

रोहित पवार म्हणाले, “कर्जत नगरपालिकेतील राजकारणाकडे माझे लक्ष नव्हते. आमच्या सर्व नगरसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. ज्या नगराध्यक्षा झाल्या आहेत त्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक राजकारणात मी हस्तक्षेप केलेला नाही.” (Maharashtra Politics)
दरम्यान, या घडामोडीमुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात राजकीय जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी दोन्ही नेत्यांकडून कोणत्याही राजकीय आघाडीबाबत किंवा व्यापक स्तरावरील सहकार्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घडामोडीकडे सध्या स्थानिक राजकीय निर्णय म्हणूनच पाहिले जात आहे. (Maharashtra Politics)





