Box Office Collection: ‘कांतारा चैप्टर 1’चा तुफानी जलवा! चार दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला

Box Office Collection: गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘कांतारा चैप्टर 1’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या दोन मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुकाबला केला आहे. परंतु साउथचा स्टार ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा चैप्टर 1’ प्रेक्षकांच्या मनात प्रचंड गाजत असून, केवळ चार दिवसांत २०० कोटींचा आकडा पार केला आहे.
‘कांतारा चैप्टर 1’चा चौथ्या दिवसाच कलेक्शन
रविवारी म्हणजेच चौथ्या दिवशी ‘कांतारा चैप्टर 1’ ने तब्बल ₹61.5 कोटींची कमाई केली.
शनिवारीही या चित्रपटाने ₹55 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे चित्रपटाचा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ₹223.82 कोटींवर पोहोचला आहे.
चित्रपटाचं बजेट सुमारे ₹125 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फक्त चार दिवसांतच चित्रपटाने आपला खर्च वसूल करून सुपरहिट ठरवला आहे.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा प्रतिसाद
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा ठीकठाक प्रतिसाद मिळत आहे.
रविवारी चित्रपटाने ₹7.75 कोटी, तर शनिवारी ₹7.5 कोटी इतकी कमाई केली.
चार दिवसांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन ₹30 कोटींवर स्थिरावलं आहे.
पवन कल्याणचा ‘दे कॉल हिम ओजी’ जवळपास २०० कोटींच्या उंबरठ्यावर
दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याण याचा ‘ओजी’ चित्रपट ११ दिवसांपासून थिएटर्समध्ये धावतो आहे.
रविवारी चित्रपटाने ₹4.35 कोटी, तर शनिवारी ₹4.6 कोटी इतकी कमाई केली.
सध्या या चित्रपटाचं एकूण देशांतर्गत कलेक्शन ₹183 कोटी झालं आहे.
मेकर्सच्या म्हणण्यानुसार, ‘ओजी’ ने जगभरात ₹300 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
‘जॉली एलएलबी 3’ने १०० कोटी क्लबमध्ये घेतली एन्ट्री
अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी 3’ १७ दिवसांपासून थिएटर्समध्ये दाखवला जात आहे.
रविवारी चित्रपटाने ₹2.20 कोटी, तर शनिवारी ₹1.75 कोटी इतका गल्ला जमा केला.
चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता ₹108.10 कोटी पार झालं असून, तो १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर सध्या साउथ चित्रपटांचा दबदबा कायम आहे.
‘कांतारा चैप्टर 1’ ने अल्पावधीतच विक्रमी कामगिरी करत हिंदी आणि साउथ दोन्ही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
तर बाकी चित्रपट आपापल्या श्रेणीत चांगली कमाई करत आहेत.





