ऋषभ पंतची तंदुरुस्तीकडे वाटचाल; कुटुंबीयांनी दिली महत्वाची माहिती
Updated On:

नवी दिल्ली -कार अपघातात दुखापत झालेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत सध्या तंदुरुस्त होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. त्याच्या चालण्यात खूप फरक पडलेला असून, तो लवकरच तंदुरुस्त ठरेल, अशी आशा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
अर्थात त्याच्या तंदुरुस्तीबाबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच (एनसीए) अधिकृतरीत्या सांगू शकेल, तसेच तो तंदुरुस्त ठरला तरीही मॅचफिट असेल का, असाही प्रश्न निर्माण होणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असाच तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र एनसीएने दिले होते. मात्र, तो मॅचफिट नसल्याचे नंतर निदर्शनाला आले होते. तसे पंतबाबत होऊ नये याची काळजी घेतली जात आहे





