Rishabh Pant Hope : ‘प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अजूनही कायम…’, पराभवानंतरही ऋषभ पंतचे वक्तव्य

LSG Captain Rishabh Pant still hopeful for playoffs : रविवारी आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जविरुद्ध ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या हंगामात लखनौचा हा सहावा पराभव होता. खराब कामगिरीमुळे निराश झालेला लखनौचा कर्णधार ऋषभ पंत अजूनही आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा बाळगतो. उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्याचा संघ परिस्थिती बदलू शकतो असा त्याचा विश्वास आहे.
लखनौचे आता ११ सामन्यांतून दहा गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रन रेट -०.४७ आहे आणि पंतचा संघ उर्वरित तीन सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. त्याला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. सध्या पंजाब किंग्ज सात विजयांमधून १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी (१६ गुण) पहिल्या स्थानावर आहे.
Rishabh Pant and LSG aren’t giving up yet! 🎯
Can they clinch three straight wins to stay in the playoff hunt? 🤔#IPL2025 #PBKSvLSG #RishabhPant pic.twitter.com/DiPHTZcMLK
— Sportskeeda (@Sportskeeda) May 5, 2025
प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अजूनही कायम – ऋषभ पंत
सामन्यानंतर पंत म्हणाला, ‘प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अजूनही कायम आहे. जर आम्ही पुढील तीन सामने जिंकलो तर परिस्थिती बदलू शकते.’ पंतने कबूल केले की २३६ धावांचे लक्ष्य खूप जास्त होते आणि त्यांचे क्षेत्ररक्षण देखील साधारण होते. तो म्हणाला, ‘आम्ही खूप धावा दिल्या. महत्त्वाच्या क्षणी झेल सोडण्याची किंमत चुकवावी लागते. आमची सुरुवात चांगली नव्हती पण हे घडते.’
हेही वाचा – Mohammad Shami : मोहम्मद शमीला आयपीएलदरम्यान जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
प्रत्येकाने योग्य वेळी योगदान दिले – श्रेयस अय्यर
दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, ‘प्रत्येकाने योग्य वेळी योगदान दिले, जे महत्त्वाचे आहे.’ ४८ चेंडूत ९१ धावा करणाऱ्या प्रभसिमरन सिंगचे कौतुक करताना तो म्हणाला, ‘त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अद्भुत होती. त्याला पाहून खूप छान वाटले. तसेच येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्हाला आमचे क्षेत्ररक्षण सुधारण्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.





