Rinku Singh Facebook : टी-२० वर्ल्डकपपूर्वी रिंकू सिंग अडचणीत! फेसबुक अकाऊंट हॅक; अलिगडमध्ये FIR दाखल
Rinku Singh Facebook : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. रिंकूचे फेसबुक अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी हॅक केले आहे.

Rinku Singh Facebook account hacked before T20 World Cup: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ ला उद्या, शनिवार ७ फेब्रुवारीपासून भारतात सुरुवात होत आहे.
मात्र, या मोठ्या स्पर्धेच्या अवघ्या काही तास आधी भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh ) एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. रिंकूचे फेसबुक अकाऊंट (Facebook Account)सायबर गुन्हेगारांनी हॅक केले असून, त्यावरून आर्थिक फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रिंकूच्या फोननंतर अलिगड पोलिसांची कारवाई –
रिंकू सिंग (Rinku Singh ) सध्या भारतीय संघासोबत मुंबईत आहे. त्याने स्वतः अलिगडचे एसएसपी नीरज जादौन यांना फोन करून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील संशयास्पद हालचालींची माहिती दिली. रिंकूने सांगितले की, तो गेल्या काही काळापासून हे अकाऊंट वापरत नाहीये, तरीही त्यावरून काही पोस्ट किंवा अॅक्टिव्हिटी होत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
रिंकूच्या माहितीनंतर त्याचा भाऊ सोनू याने अलिगड पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला आहे.
क्रिकेटर रिंकू सिंह की फेसबुक आईडी हैक कर ली गई है।
उनके अकाउंट पर 1.6 मिलियन फॉलोअर्स हैं।
हैकर उनकी कमाई भी अपने खाते में ले रहे हैं।
रिंकू सिंह के भाई ने इस मामले में रिपोर्ट दर्ज कराई है। 😱#rinkusingh pic.twitter.com/fbSujN8bZC— Pradeep Rai (@pkr2018_) February 6, 2026
१६ लाख फॉलोअर्सवर सायबर हल्ला –
रिंकू सिंगचे फेसबुक अकाउंट हॅक
रिंकू सिंगच्या या फेसबुक अकाऊंटवर सुमारे १.६ मिलियन (१६ लाख) फॉलोअर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्याने हॅकर्स या अकाऊंटचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी किंवा चाहत्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आलेले नाही, मात्र हॅकर्सचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे.
हेही वाचा – Harshit Rana Injured : टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ हुकमी एक्का दुखापतीमुळे संघाबाहेर
उद्या अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरणार –
एकीकडे सायबर हल्ल्याचा तपास सुरू असताना, रिंकू सिंग उद्या (७ फेब्रुवारी) अमेरिकेविरुद्धच्या (USA) पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात रिंकूने आपल्या तुफानी फलंदाजीने जबरदस्त फॉर्म सिद्ध केला आहे. फिनिशर म्हणून रिंकूवर उद्याच्या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे.





