पुणे आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनांचा ठिय्या
Updated On:

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – शहरातील विविध रिक्षा संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सोमवारी आंदोलन केले. यावेळी शिवनेरी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, भाजप वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आठ दिवसांपासून परिवहन कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर आंदोलन सुरू आहे. पण, त्याची दखल आरटीओ घेत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी थेट प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे याच्या दालनासमोर ठिय्या मांडला. यावेळी विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. तसेच मागण्यामान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेने जाहीर केले आ





