Shikhar Dhawan Statement : ‘हे सहन केले जाऊ शकत नाही’; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर शिखर धवन संतप्त

Shikhar Dhawan Statement on Bangladesh crime : बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांवर भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एका हिंदू महिलेवर झालेल्या अमानवीय कृत्याचा निषेध करत धवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाचे लक्ष या गंभीर परिस्थितीकडे वेधले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नुकताच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बांगलादेशातील एका हिंदू विधवेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आणि त्यानंतर तिला झाडाला बांधून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिखर धवनने ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे.
Heartbreaking to read about the brutal assault on a Hindu widow in Bangladesh. Such violence against anyone, anywhere is unacceptable. Prayers for justice and support for the survivor. 🙏
— Shikhar Dhawan (@SDhawan25) January 7, 2026
या पोस्टमध्ये शिखर म्हणाला, “बांगलादेशातील एका हिंदू विधवेवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल वाचून मन विदीर्ण झाले. कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, कुठेही अशी हिंसा खपवून घेतली जाऊ शकत नाही. पीडितेसाठी न्याय आणि समर्थनाची मी प्रार्थना करतो.” शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो जगभरातील घडामोडींवर आपली स्पष्ट मते मांडण्यासाठी ओळखला जातो.
हेही वाचा – ICC Reject BCB : ‘खेळायचं असेल तर भारतातचं खेळा नाहीतर…!’, ICC ने बांगलादेशची मागणी फेटाळली
बांगलादेशात हिंदू टार्गेटवर; हत्यांचे सत्र सुरूच –
गेल्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून बांगलादेशात हिंदू धर्मीयांवरील हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आकडेवारीनुसार डिसेंबरपासून आतापर्यंत किमान ६ हिंदूंची हत्या झाली आहे.
- ५ जानेवारी: जेसोर जिल्ह्यात व्यापारी आणि वृत्तपत्र संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच दिवशी शरत मणी चक्रवर्ती या किराणा दुकानदाराचाही मृत्यू झाला.
- ३ जानेवारी: शरियतपूर जिल्ह्यात खोकन चंद्र दास यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जाळण्यात आले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – Arjun Tendulkar Wedding : लग्नाची तारीख ठरली! सचिन तेंडुलकरच्या घरी ‘या’ दिवशी वाजणार सनईचौघडे
बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यात तणाव; विश्वचषकावर सावट –
या हिंसाचारामुळे भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डांमधील संबंधही ताणले गेले आहेत. नुकतेच आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला रिलीज केले. या घडामोडींनंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर आयसीसीने त्यांची मागणी फेटाळली आहे. २०२६ चा विश्वचषक कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा यासाठी प्रयत्नशील आहे.





