ICC Reject BCB : ‘खेळायचं असेल तर भारतातचं खेळा नाहीतर…!’, ICC ने बांगलादेशची मागणी फेटाळली

ICC Reject BCB Request about T20 World Cup 2026 : आगामी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या आयोजनाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षेचे कारण देत आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पूर्णपणे फेटाळून लावली आहे. यामुळे बांगलादेश संघाला आता त्यांचे सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसार भारतातच खेळावे लागतील किंवा स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकतो.
नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेली राजकीय परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अलीकडेच एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतीय दौऱ्यावर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. “सध्याची परिस्थिती पाहता भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही,” असा दावा करत बीसीबीने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे केली होती.
आयसीसीने दिला कडक इशारा –
🚨 ICC REJECTS BCB REQUEST. 🚨
⚠️ The ICC has denied Bangladesh’s request to shift their T20 World Cup matches.
📢 The ICC cleared to BCB that play in India or forfeit their points. (Espncricinfo). pic.twitter.com/16jNA5ZEvY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2026
काल आयसीसी आणि बीसीबी यांच्यात या विषयावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आयसीसीने स्पष्ट केले की सुरक्षेच्या कारणास्तव सामने इतर देशात हलवण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. बांगलादेशला विश्वचषकासाठी भारतात प्रवास करणे अनिवार्य आहे. जर संघ भारतात खेळण्यासाठी आला नाही, तर त्यांना स्पर्धेतील गुण गमवावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना एकतर भारतात यावे लागेल किंवा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. जर स्पर्धेतून माघार घेतली तर बांगलादेशला मोठा आर्थिक फटका बसेल.
हेही वाचा – Bangladesh Boycott Loss : भारताशी नडला तर बांगलादेश रडला! विश्वचषकावर बहिष्कार टाकणं पडणार महागात?
बांगलादेशचे विश्वचषकातील वेळापत्रक –
नियोजित वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे तीन सामने कोलकाता येथे तर एक सामना मुंबईत होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभासाठी बांगलादेश संघ काय निर्णय घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
| तारीख | प्रतिस्पर्धी संघ | ठिकाण |
| ७ फेब्रुवारी | वेस्ट इंडीज | ईडन गार्डन्स, कोलकाता |
| ९ फेब्रुवारी | इटली | ईडन गार्डन्स, कोलकाता |
| १४ फेब्रुवारी | इंग्लंड | ईडन गार्डन्स, कोलकाता |
|
१७ फेब्रुवारी
|
नेपाळ | वानखेडे स्टेडियम, मुंबई |
हेही वाचा – Arjun Tendulkar Wedding : लग्नाची तारीख ठरली! सचिन तेंडुलकरच्या घरी ‘या’ दिवशी वाजणार सनईचौघडे
२०२६ विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ:
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन, सैफ हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शैफुद्दीन, शरीफुल इस्लाम.





