पुण्याच्या रायडर्सने ‘स्पोर्ट्सक्राफ्ट नाशिक मान्सून रॅली’मध्ये जिंकली प्रेक्षकांची मनं

पुणे : ‘स्पोर्ट्सक्राफ्ट नाशिक मान्सून रॅली’ 26 आणि 27 जुलै रोजी पार पडली. यावेळी भर पावसात खडतर अशा २१ किमी. अंतराच्या या रॅली रेसमध्ये पुण्यातील अमरेंद्र साठे, हितेश घाटगे, पुरुषोत्तमआबा मते, ॲड. राजू मते व लोकेश भोसले या रायडर्सने सहभाग घेतला होता.
यात पुण्याच्या अमरेंद्र साठे यांनी इलेक्ट्रिक स्कुटर क्लासमध्ये पहिला आणि व्हेटर्न क्लास मध्ये दुसरा क्रमांक मिळवला. हितेश घाटगे यांनी इलेक्ट्रिक स्कुटर क्लासमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. तर ॲड. राजू मते यांनी फर्स्ट टाइमर्स क्लासमध्ये पहिला तर आणि व्हेटर्न क्लास मध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
याशिवाय पुण्याचे रायडर तसेच बाईक मेकॅनिक नीरज वांजळे यांना ‘बेस्ट ट्युनर’ या विशेष ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, देशामध्ये व देशाबाहेरही वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अनेक रेसिंग स्पर्धांमध्ये पुण्यातील रायडर्सच्या अशा यशामुळे मोटर स्पोर्ट्समध्ये पुण्याची मान दिवसेंदिवस उंचावत आहे.





