घुसखोरांनो चालते व्हा!

मुंबई – सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूची यावरून देशभरात प्रचंड तांडव सुरू आहे. याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून “सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे परंतु पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत.” अशी पोस्ट करण्यात आली आले. तसेच, यावेळी मनसे मनसैनिकांनी आपल्या शरीराला रंग लावून विरोध आणि समर्थन दर्शवलं आहे.
…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/yLNhQQ8HI7
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 5, 2020






