‘साई बाबा’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींच्या मदतीसाठी रिद्धिमा कपूरचा मदतीचा हात; पण ‘या’ कारणामुळे होतेयं टीका

Sudhir Dalvi Hospitalized | ‘शिर्डी के साई बाबा‘ या चित्रपटात साईबाबांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी उत्तमरित्या साकारली होती. यातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्याबाबत एक माहिती समोर आली आहे. सुधीर दळवी यांची प्रकृती बिघडली आहे. सुधीर दळवी 86 वर्षांचे आहेत. ते 8 ऑक्टोबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत.
सुधीर दळवी यांनी सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन झाले आहे. त्याच्या उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली. यासाठी रणबीर कपूरची बहीण रिद्धीमाने आर्थिक मदत केली असून ते यातून बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.
View this post on Instagram
रिद्धिमा कपूरने एका सोशल मिडिया पोस्टवर कमेंट करून आपण मदत केल्याची माहिती दिली. मात्र यावरून तिच्यावर सोशल मिडियावर टीका केली जात आहे. एकाने लिहिलं- ‘इथेही फुटेज हवं’ तर दुसऱ्याने लिहिलं- ‘मदत लपून करायला हवी’. मात्र रिद्धिमाने देखील यावर सडेतोड उत्तर दिले आहे. तिने लिहिलं की, “जीवनात प्रत्येक गोष्ट फक्त दिखाव्यासाठी करायची नसते. एखाद्या गरजू व्यक्तीला, आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.”
मीडिया रिपोर्टनुसार, सुधीर दळवी यांच्या उपचाराचा एकूण खर्च 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जो त्यांच्या कुटुंबाला पेलणार नाही. त्यामुळेच त्यांच्या मदतीसाठी आता काही जण पुढे येत आहे. सुधीर दळवी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. याशिवाय ‘जय संतोषी माँ‘ आणि ‘रामायण‘सारख्या टीव्ही मालिकांमधूनही त्यांची लोकप्रियता वाढली. सुधीर यांनी ‘विधिलिखित’, ‘ऐकावं ते नवल’, ‘देवता’, ‘घर संसार’ या मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.
हेही वाचा:
अभिनेत्री महिमा चौधरीने वयाच्या ५२ वर्षी केलं लग्न? ‘या’ अभिनेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल

