मांजरी – मुळात समाजात कोणीच अनाथ नसावे .मात्र, परिस्थितीनुरूप अनेकांना अनाथ व्हावे लागते. अशावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून अनाथ मुला- मुलींना मदत करण्यात एक वेगळाच आत्मिक आनंद आहे.
सायकल मिळताच या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला आनंद पहावून आज खर्याखुर्या समाधानाची अनुभुती आली , अशी भावना भाजपा हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांनी व्यक्त केली.
भाजप हडपसर अध्यक्ष संदिप दळवी व त्यांचे मित्र बाळासाहेब राऊत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मांजरी खुर्द येथील माहेर अनाथाश्रम या संस्थेतील अनाथ मुला- मुलींना दहा सायकली भेट दिल्या आहेत.
संदिप दळवी म्हणाले की वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेतील व्यवस्थापक सचिन पिसे यांना संपर्क साधून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार त्यांनी येथील काही मुला- मुलींना सायकली दिल्या तर त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा होईल, असे सांगितले त्यावर लगेचच मी आणि माझे मित्र बाळासाहेब आम्ही दोघांनी येथे दहा सायकली दिल्या.
मुलांनी या सायकली पाहिल्यानंतर त्यांचा आनंद आणि सायकली प्रत्यक्ष हातात घेऊन त्यांना खेळताना पहाऊन खूपच मोठे समाधान मिळाले आहे.यावेळी गणेश घुले,कैलास जगताप,विश्वास दिवेकर,सुधीर घुले ,प्रशांत दौंडकर, अजय पायगुडे,संतोष जाधव आदीजण उपस्थित होते.