‘अग्रवाल समाज फेडरेशन’चा ‘माता माधवी पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात

पुणे : भारतात महिलांची सुरक्षा अद्यापही पूर्णतः सुनिश्चित झालेली नाही. राष्ट्रीय गुन्हे अहवाल 2023 नुसार, दर तासाला 51 महिला गुन्हे व शोषणाच्या बळी ठरत आहेत. यामध्ये 31 टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराला सामोऱ्या जातात. महिलांना सक्षम करण्याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. जेव्हा कुटुंबस्तरावर महिलांचा सन्मान वाढेल, तेव्हाच त्या समाजात आणि देशात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतील, असे विचार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया यांनी पुण्यातील बोट क्लब येथे अग्रवाल समाज फेडरेशन महिला समितीच्या वतीने आयोजित ‘माता माधवी अग्र गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात मांडले. या वेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने स्वतःहून पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात वास्तू विशारद टॅरो कार्ड वाचक राजनी सिंघल, अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजबाला कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध समाजसेवी अग्र भूषण पवन सराफ, प्रखर सनातनी अंजलि सराफ, फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बंसल, सेक्रेटरी सीए के एल बंसल, खजिनदार श्याम पी गोयल, महिला समिति अध्यक्षा नीता अग्रवाल, उपाध्यक्षा मीना देवेंद्र गोयल, सचिव उषा तुलस्यान, कोषाध्यक्षा लक्ष्मी गोयल, मान्यवर जेष्ठ पदाधिकारी महेंद्र पाटोदिया, विजय जी मित्तल, संजय अग्रवाल, प्रिन्स रतनजी गोयल, राजेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने पाहुणे आणि पुरस्कार घेणारे होते. या समारंभात द्रौपदी वसंतलाल अग्रवाल यांना जीवन गौरव पुरस्कारासह 26 महिलांना विविध क्षेत्रात योगदानासाठी विविध पुरस्कार देण्यात आले.
समाजाच्या महिलांचा सर्वच क्षेत्रात प्रभावी सहभाग – कृष्ण कुमार गोयल
यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल यांनी सांगितले की, समाजातील महिला आता केवळ घरातच नव्हे, तर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही मोठे योगदान देत आहेत. ‘माता माधवी अग्र गौरव पुरस्कार’ मागील 9 वर्षांपासून समाजाच्या विविध क्षेत्रांतील महिलांना देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे.
गौरव पुरस्कार सोहळा आणि सन्मानित महिलांची नावे –
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
– जीवन गौरव पुरस्कार : द्रौपदी वसंतलाल अग्रवाल
– कल, आज और कल पुरस्कार : रामबाई सत्यदेव गर्ग, संतोष सुरेश गर्ग, श्रुती अमन गर्ग
– शतायुषी सन्मान : अनुसूया शिवपुराण झुनझुनवाला, अंगूरी देवी रामकिशन अग्रवाल
– आदर्श माता पुरस्कार : निर्मला ओमप्रकाश अग्रवाल, अनारकली ओमप्रकाश गुप्ता
– आदर्श गृहिणी पुरस्कार : संतोषी देवी ईश्वर अग्रवाल, कौशल्या विजय कुमार गुप्ता
– सामाजिक क्षेत्रातील योगदान : सेवापति रतनलाल गोयल, मंजू सचिन अग्रवाल
– वैद्यकीय क्षेत्रातील योगदान : डॉ. सृष्टि अग्रवाल, डॉ.आरती सुशील अग्रवाल
– शैक्षणिक क्षेत्रातील योगदान : गीता सनी गर्ग, अनुष्का पंकज सलामपुरिया
– व्यावसायिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य : दीपा संदीप अग्रवाल, पूजा अमूल अग्रवाल
– धार्मिक क्षेत्रातील योगदान : आशा गोपी किशन अग्रवाल, मायादेवी मित्रसेन गर्ग
– उद्योजकता क्षेत्रात उत्कृष्टता : मंजू अभय अग्रवाल, मेघा सुमित अग्रवाल, सपना अंकुश अग्रवाल
– आयटी क्षेत्रात उपलब्धी : सबिता विशाल अग्रवाल, निधी आकाश अग्रवाल
– संघर्षशील नारी पुरस्कार : कृष्णा साधुराम गर्ग, मीना नरेश गर्ग
दरम्यान, या सोहळ्याला अग्रवाल समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता चंद्रशेखर अग्रवाल आणि उषा तुलस्यान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी गोयल, अश्विनी अग्रवाल, सुजाता अग्रवाल, निर्मल अग्रवाल यांनी विशेष योगदान दिले. सर्व सहभागी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजन आणि स्नॅक्सची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.



