Saswad : पुरंदर तालुका काँग्रेसची आढावा बैठक
Saswad : बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पाणीटंचाई, शेती व ग्रामीण भागातील प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षकांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.

सासवड : पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच आगामी काळात पक्षाची विहित रचना कशी असावी, यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस निरीक्षक म्हणून माजी आमदार रामहरी रुपनवर, आर. सी. खरात तसेच पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लहू निवंगुणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पाणीटंचाई, शेती व ग्रामीण भागातील प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षकांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
पक्ष संघटन सक्षम करण्याचा संकल्प
आगामी काळात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तालुका व गावपातळीवर पदाधिकारी नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली. पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत संधी उपलब्ध करून देणे आणि पक्षाची संघटनात्मक रचना अधिक सक्षम करणे, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच पक्षाचे विचार व ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस तालुका अध्यक्ष संभाजी जगताप, राजेंद्र बरकडे, साहेबराव फडतरे, सचिन दुर्गाडे, बाळासाहेब कड, किरण ताकवले, बापू मोकाशी, प्रमोद ताकवले, मुन्ना खोपडे, सागर जगताप, सचिन मेमाणे, अक्षय शेळके, सतीश गायकवाड, विशाल हरपळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे पुरंदर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीला दिशा मिळणार असून, पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.





