Pune District : फुलेंचे विचारआचरणात आणणे काळाची गरज- प्रा. दुर्गाडे
Pune District : जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते महात्मा फुले स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

वाल्हे : महात्मा फुले हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. समाजात न्याय, समानता आणि बंधुता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. फुले यांचे विचार जातीयवादी विचारांच्या पलीकडचे होते. त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे, हीच काळाची खरी गरज आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे येथे व्यक्त केले. क्रांतीसूर्य समता विकास प्रतिष्ठान, अखिल भारतीय समता परिषद आणि वाल्हेकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वाल्हे (ता. पुरंदर) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते महात्मा फुले स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वाल्हे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून समता रॅली काढली. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने वाल्हे परिसरातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, पंचायत समिती सदस्या मोनिका कांबळे, वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे, मुख्याध्यापक भारत वाघोले, राजेंद्र डोंगरे, शैला गवारी, अनिता वाघोले आदींनी महात्मा फुले यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त करून अभिवादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भुजबळ, कार्याध्यक्ष शंकर भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, उपाध्यक्ष महावीर भुजबळ, प्रा. संतोष नवले, खजिनदार अनिल भुजबळ, सचिव तुषार भुजबळ, कार्यकारिणी सदस्य मनोज भुजबळ, दादासाहेब राऊत, सुभाष दुर्गाडे, विलास भुजबळ, भालचंद्र भुजबळ, राहुल भुजबळ, समीर भुजबळ, गणेश दुधाळ, निलेश कुदळे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन शंकर भुजबळ यांनी केले, तर आभार सूर्यकांत भुजबळ यांनी मानले.
फुलेंच्या विचारांचा जागर होणे आवश्यक
स्मृतिदिनाचा कार्यक्रम म्हणजे केवळ पुतळ्याला अभिवादन करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या समतावादी विचारांच्या चळवळीतून समाजासाठी काम केल्यास त्यांना केलेले अभिवादन खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल, असे मत यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले.
मान्यवरंची उपस्थिती
कार्यक्रमास माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, उपसरपंच सागर भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, माजी कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, दौंडजचे माजी सरपंच दामोदर कदम, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, सुकलवाडीचे माजी सरपंच संदेश पवार, उद्योजक गोरख कदम, रविंद्र भुजबळ, त्रिंबक भुजबळ, सोनबा भुजबळ, रमेश पवार, शिरीष नवले, किरण भुजबळ, उद्योजक गुणवंत राऊत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.





