Manchar : मंचरच्या विकास आराखड्याविरोधात शेतकऱ्यांची एकजूट
Manchar : तरुण रस्त्याच्या विस्तारामुळे दुकाने व घरे बाधित होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.छत्रपती संभाजी महाराज चौक ते शनिवार महाराज मंदिर आणि ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर परिसरातील नागरिकांनीही हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन केले.बाधित शेतकरी अरुण लोंढे यांनी बैठकांमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आधार मिळत असल्याचे सांगितले.

मंचर : मंचर शहराच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यात अनेक शेतजमिनींमधून मोठे रस्ते प्रस्तावित करण्यात आल्याने बाधित शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत हरकती नोंदविण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले.
चांडोलीरोड, जाधवमळा, माळवाडी, मुळेवाडी, ढोबीमळा, गोकर्णेश्वरनगर, लोंढेमळा, खानदेशेमळा, माशेरेमळा व भिलवाडी येथे या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये हरकत अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांनी मुदतीत जास्तीत जास्त हरकती दाखल करण्याचे आवाहन केले.
उबाठा पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.राजाराम बाणखेले यांनी आराखड्याला स्थगिती देऊन बाधित जागांसाठी पर्यायी जागांचा विचार करण्याची मागणी केली.कॉंग्रेस आय पक्षाचे माजी अध्यक्ष राजू इनामदार यांनी गावठाणातील नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे सांगितले.
तरुण रस्त्याच्या विस्तारामुळे दुकाने व घरे बाधित होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.छत्रपती संभाजी महाराज चौक ते शनिवार महाराज मंदिर आणि ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर परिसरातील नागरिकांनीही हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन केले.बाधित शेतकरी अरुण लोंढे यांनी बैठकांमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आधार मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, कल्पेश अप्पा बाणखेले, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात, कुणाल बाणखेले, सालीम इनामदार यांच्यासह शेतकरी, युवक, महिला व नागरिक उपस्थित होते. विकासाला विरोध नसून शेतकऱ्यांचे नुकसान टाळून नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.





