Revenue Scam : महसूल जमीन घोटाळ्यातील ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
राज्यातील सर्वात मोठा महसूल घोटाळा (Revenue Scam) झाला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच 18 मार्च 2026 रोजी विधान परिषदेत मान्य केले.

Revenue Scam : राज्यातील सर्वात मोठा महसूल घोटाळा (Revenue Scam) झाला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच 18 मार्च 2026 रोजी विधान परिषदेत मान्य केले. यानंतर आता जे अधिकारी सापडलेले आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देणार आहोत.
अधिकाऱ्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांना निलंबित (Revenue Scam) करणे, पुढची विभागीय चौकशी करणे आणि फौजदारी कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माहितीनंतर अनिल परब यांनी तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर बावनकुळे यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
अनिल परब म्हणाले की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यादिवशी सभागृहात सांगितलं की, महसूल विभागातला आतापर्यंतच्या इतिहासातला महाघोटाळा आहे. तसे टायटल दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आले. या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्देश खूप चांगला आहे की, ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अनिल परब यांची भावना बरोबर आहे की, ज्यांनी अतिगंभीर गुन्हा (Revenue Scam) केला. त्यामुळे 13 प्रकरणात जे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना सक्तीच्या रजेवर आजपासून पाठवू. 15 दिवसांत या प्रकरणाचा खुलासा घेऊ आणि त्यानंतर जी अतिगंभीर कारवाई प्रस्तावित केली आहे, विभागीय आयुक्त नाशिक यांनी ती कारवाई करू. तसेच 15 दिवसांनी नोटीस देऊन आजपासून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.






