Revenue department : पौड मुळशी तहसील कार्यालय संपामुळे आज कामकाज बंद असल्याने तहसील आवारात सुकसुकाट दिसून आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून, या संपात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सहभागी होत असल्याने राज्यातील महसूल विभागाचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विभागासह राज्यभरातील पदोन्नत नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तहसील कार्यालये, उपविभागीय कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांतील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम होणार आहे. (Revenue department) Revenue department : महसूल विभागाचा बेमुदत संप; राज्यभर कामकाजावर मोठा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, पदोन्नती, रिक्त पदे तात्काळ भरणे, कामाचा वाढता ताण कमी करणे तसेच विविध सेवा अटींमध्ये सुधारणा करणे या प्रमुख मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. अनेक वेळा निवेदने, बैठका आणि चर्चा करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. (Revenue department) सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रे, जमीन व्यवहार, नोंदणीसंबंधी कामे तसेच इतर महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. शेतकरी, विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हेही वाचा: Gut Health: तुमचं पोट खरंच हेल्दी आहे का? हे टेस्ट सांगतील आतड्यांची खरी स्थिती