Gut Health: आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय, फुफ्फुसे किंवा यकृत यांची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच महत्त्वाची आहे आतड्यांची म्हणजेच गट हेल्थची काळजी. पण अनेकदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या मते, गट हेल्थ म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याचा पाया आहे. आपल्या आतड्यांमध्ये लाखो-कोट्यवधी “गुड” आणि “बॅड” बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास, शरीराला आवश्यक पोषक घटक शोषून घेण्यास, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गट हेल्थ व्यवस्थित असेल तर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. Gut Health पण जर गट हेल्थ बिघडली तर शरीर काही संकेत देऊ लागते. वारंवार पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे, जेवणानंतर जडपणा जाणवणे, थकवा येणे किंवा त्वचेवर पिंपल्स येणे ही सगळी लक्षणे गट खराब असल्याचे संकेत असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञ सांगतात की, चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे गट हेल्थवर वाईट परिणाम होतो. फास्ट फूड, कमी झोप, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आतड्यांमधील बॅक्टेरियाचा समतोल बिघडतो आणि पचनसंस्था कमकुवत होते. Gut Health Gut Health गट हेल्थ खराब असल्यास आणखी काही लक्षणेही दिसू शकतात. जसे की, सतत गॅस, अपचन, पोटदुखी, गोड खाण्याची जास्त इच्छा, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. याशिवाय मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. चिंता, मूड स्विंग्स आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्वचेवर अॅलर्जी, रॅशेस किंवा मुरुमे येणे हे देखील गट हेल्थ खराब असल्याचे संकेत असू शकतात. आपली गट हेल्थ कशी आहे हे जाणून घेण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे टेस्ट करून घेतल्यास अचूक माहिती मिळू शकते. (Gut Health) फीकल कॅल्प्रोटेक्टिन टेस्ट ही एक स्टूल टेस्ट आहे, ज्यातून आतड्यांमध्ये सूज आहे का हे कळते. सीलिएक रोगासाठी tTg-IgA ही रक्त तपासणी केली जाते, जी पोटदुखी, जुलाब किंवा सूज यासाठी उपयुक्त असते. एच. पायलोरी ब्रीथ टेस्टमुळे पोटात बॅक्टेरियाचा संसर्ग आहे का हे समजते, जो अल्सरचे कारण असू शकतो. पॅन्क्रियाटिक इलास्टेस टेस्टमुळे पॅन्क्रियास अन्न किती चांगल्या प्रकारे पचवत आहे हे कळते. एकूणच, गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताण कमी ठेवणे आवश्यक आहे. लक्षणे दिसल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळी काळजी घेतल्यास अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात.