Reva Diamonds: अक्षय्य तृतीया निमित्त रेवा डायमंड या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. ४ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर महाराष्ट्रातील सर्व ऑफलाइन स्टोअर्स तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स समूहाच्या १९० वर्षांहून अधिक विश्वासार्ह परंपरेतून प्रेरित असलेल्या या ब्रँडने यंदाच्या सणासाठी ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार विविध कलेक्शन सादर केले आहे. परंपरेनुसार अक्षय्य तृतीया हा सण सोन्याच्या खरेदीसाठी ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काळात प्रमाणित नैसर्गिक हिऱ्यांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. टिकाऊ मूल्य आणि आधुनिक लक्झरीचे प्रतीक म्हणून डायमंड ज्वेलरीला अधिक पसंती मिळत आहे. या कलेक्शनमध्ये डायमंड स्टड्स, डेली वेअर इअररिंग्स, हलक्या वजनाचे पेंडंट्स आणि रिंग्स यांचा समावेश असून, हे पर्याय एंट्री-लेव्हल ग्राहक आणि गिफ्टिंगसाठी योग्य मानले जात आहेत. तसेच सणासुदीच्या खरेदीसाठी स्टेटमेंट नेकलेस आणि कॉकटेल रिंग्स उपलब्ध आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीने सॉलिटेअर्स आणि प्रमाणित डायमंड्सही सादर करण्यात आले आहेत. Gen Z ग्राहकांसाठी लेयर्ड स्टाइलिंगला साजेशी ब्रॅसलेट्स आणि स्टॅकेबल ज्वेलरीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्राहकांना १०० टक्के एक्सचेंज व्हॅल्यूची सुविधा देण्यात येत असून, यामुळे दीर्घकालीन विश्वास आणि मूल्य मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले की, “अक्षय्य तृतीया हा समृद्धीचा सण आहे. डायमंड ज्वेलरी आता भावनिक तसेच आर्थिक गुंतवणूक म्हणूनही पाहिली जात आहे. या ऑफरमुळे अधिकाधिक ग्राहकांना दर्जेदार डायमंड ज्वेलरीकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी पौड रोड येथील Punyayee Business Square तसेच वाकड येथील Phoenix Mall of the Millennium मधील रेवा डायमंडचे एक्सक्लुझिव्ह शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष ऑफरद्वारे रेवा डायमंड ग्राहकांना परंपरा, आधुनिकता आणि समृद्धीचा संगम अनुभवण्याची संधी देत आहे.