Amit Modak : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीला नवा ट्रेंड; वजनापेक्षा डिझाइन आणि बजेटला ग्राहकांची पसंती – अमित मोडक
Amit Modak : सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीत बदल झाला आहे. दसऱ्याला वजनापेक्षा डिझाइन, सौंदर्य आणि बजेटला पसंती मिळत असल्याचे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे अमित मोडक यांनी सांगितले.

Amit Modak : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा देताना पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेडचे संचालक अमित मोडक यांनी यंदाच्या सोने खरेदीतील बदलत्या ग्राहकवृत्तीवर भाष्य केले. सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीत बदल झाला असून, आता वजनापेक्षा दागिन्यांचे सौंदर्य, डिझाइन आणि बजेटला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी ही केवळ परंपरा नसून भावनिक जिव्हाळा आणि दीर्घकालीन विश्वासाशी जोडलेली असल्याचे मोडक म्हणाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करताना ग्राहकांना योग्य माहिती, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत मोडक यांनी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशा शुभेच्छा दिल्या.





