Reva Diamond : रेवा डायमंडची अक्षय्य तृतीयेला जोरदार विक्री; महसूलात वार्षिक पातळीवर 2.67 पट वाढ
पु ना गाडगीळ आणि सन्स समूहाच्या 190+ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या रेवा डायमंड (Reva Diamond) या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने, यंदाच्या अक्षय्य तृतीया (19 एप्रिल 2026) निमित्त उत्कृष्ट विक्री कामगिरी नोंदवत आर्थिक वर्ष 2026-27 ची दमदार सुरुवात केली आहे.

Reva Diamond : पु ना गाडगीळ आणि सन्स समूहाच्या 190+ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या रेवा डायमंड (Reva Diamond) या प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरी ब्रँडने, यंदाच्या अक्षय्य तृतीया (19 एप्रिल 2026) निमित्त उत्कृष्ट विक्री कामगिरी नोंदवत आर्थिक वर्ष 2026-27 ची दमदार सुरुवात केली आहे.
रेवा डायमंडने (Reva Diamond) नुकत्याच झालेल्या गुढी पाडवा (23 मार्च 2026) दरम्यानही वार्षीक पातळीवर भक्कम महसूल वाढ नोंदवली होती. त्यानंतर चौथ्या तिमाही (6 एप्रिल 2026) मध्ये 96.9% वार्षीक पातळीवर महसूल वाढ साध्य करत कंपनीने सातत्यपूर्ण प्रगती कायम ठेवली. प्रमाणित नैसर्गिक डायमंड ज्वेलरीकडे ग्राहकांचा वाढता कल स्पष्ट दिसून येत आहे.
अक्षय्य तृतीये निमित्त कंपनीने 2026-27 मध्ये 127.27 दशलक्ष रुपये इतका महसूल नोंदवला, जो 2025-26 मधील याच दिवशीच्या 34.63 दशलक्ष महसुलाच्या तुलनेत 2.67 पट (267.49%) वाढ दर्शवतो. पारंपरिकरित्या सोन्याच्या खरेदीसाठी ओळखल्या जाणार्या या सणात डायमंड ज्वेलरीकडे वाढणारा ग्राहकांचा कल या यशातून अधोरेखित होतो.
नुकत्याच सुरू झालेल्या दोन एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स – वाकड, पुणे (4 सप्टेंबर 2025) आणि पौड रोड, पुणे (15 मार्च 2026) – यांनी आपली पहिली अक्षय्य तृतीया साजरी करत एकत्रित 6.87 दशलक्ष महसूल नोंदवला.
रेवा डायमंड्स (Reva Diamond) या संस्थेने एकूण 36 स्टोअर्सचे जाळे विस्तारले आहे, ज्यामध्ये 2 एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स आणि 34 शॉप-इन-शॉप स्टोअर्सचा समावेश आहे, ज्यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये ब्रँडची पोहोच अधिक मजबूत झाली आहे.
पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पुर्ण वेळ संचालक अमित मोडक म्हणाले, प्रमाणित नैसर्गिक हिर्यांचे दागिने हे केवळ आकर्षक खरेदी नसून दीर्घकालीन मूल्य असलेली गुंतवणूक म्हणूनही पाहिले जात आहेत.






