Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला खरेदी वाढण्याची शक्यता – डॉ. सौरभ गाडगीळ
Akshaya Tritiya:

Akshaya Tritiya: अक्षय तृतीया साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला भारतातील सोन्याच्या खरेदीसाठी सांस्कृतिक तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. यावर्षी अक्षय तृतीया लग्नसराईच्या हंगामासोबत येत असल्याने ग्राहकांमध्ये दागिने खरेदीचा उत्साह अधिक वाढलेला दिसत आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
सोन्याच्या किमतीत कितीही उच्चांक असला तरीही ग्राहक आपल्या खरेदीवर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मध्य भारतीय बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत 25% ते 30% वाढ होईल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर पीएनजी ज्वेलर्स गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख बाजारपेठांमध्ये विशेष मोहिमा राबवत आहे. यामध्ये ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर आणि मेकिंग चार्जेसवर 20 एप्रिल 2026 पर्यंत अनेक सवलती देण्यात येणार आहेत. (अटी व शर्ती लागू)*
नवीन दागिन्यांचा संग्रह, डिझाईन्स, आकर्षक सवलती आणि दुकानांच्या वाढीव वेळापत्रकाच्या मदतीने आम्ही ग्राहकांना या शुभ प्रसंगी अधिक मूल्य आणि विविधतेसह खरेदीचा उत्तम अनुभव देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.





