Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शिवसेनेतील बड्या नेत्याचा राजीनामा, राज्याच्या राजकारणात खळबळ
Maharashtra Politics : दापोलीच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला अखेर मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

Maharashtra Politics : दापोलीच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला होता. त्याच पार्श्वभूमीवर रेळेकर यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
रामदास कदमांकडून कानउघडणी?
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही दखल घेतल्याची माहिती आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रसाद रेळेकर यांना फोन करून त्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठा धक्का? ‘हा’ बडा नेता भाजपात प्रवेश करणार?
कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या कर्मचाऱ्यांशी धमकीवजा भाषेत संभाषण झाल्याचा आरोप आहे. या कथित संभाषणात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा केला जात आहे. (Maharashtra Politics)
“माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश” तसेच “माझा आदेश म्हणजे शिवसेना पक्षाचा आदेश” अशा आशयाचे वक्तव्य क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. (Maharashtra Politics)
ई-शिवाई बसच्या ड्युटीवरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, दापोलीतील ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी नियोजनावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगितले जाते. तीन चालकांच्या ड्युटीच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचारी आणि कथित ऑडिओमधील व्यक्तीमध्ये संभाषण झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics)
ड्युटी कोणाची, कोणत्या मार्गावर आणि कोणत्या पद्धतीने लावायची, यावरून सुरू झालेला वाद पुढे कथित धमकीवजा संभाषणापर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. ई-शिवाई बसचे कंत्राट मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असल्याचे सांगितले जात असल्याने ड्युटी नियोजनाचा मुद्दा संबंधित कंत्राटदाराच्या प्रशासकीय कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याचीही चर्चा आहे. (Maharashtra Politics)
नव्या शहरप्रमुखासाठी हालचाली
रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर दापोली शिवसेनेच्या नव्या शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. यासाठी दापोलीत पक्षाच्या पातळीवर बैठक झाल्याचेही सांगितले जात आहे. शहरप्रमुख पदासाठी काही संभाव्य नावांवर चर्चा सुरू असली तरी नव्या शहरप्रमुखाबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)
दरम्यान, कथित ऑडिओ क्लिपमध्ये योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. (Maharashtra Politics)
रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर दापोली शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आता नव्या शहरप्रमुखाची निवड कोणाची होते आणि या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर पक्ष नेतृत्व पुढे काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठा धक्का? ‘हा’ बडा नेता भाजपात प्रवेश करणार?






