Maharashtra Politics : महाराष्ट्रात खळबळ..! भाजप आमदाराला संपवण्याचा कट; थेट चालकालाच दिली गोळ्या घालण्याची ऑफर
Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा मोठा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra Politics : भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकालाच पैशांचे आमिष दाखवल्याची धक्कादायक घटना सोलापुरात समोर आली आहे. ‘तुझ्या आमदाराला गोळ्या घाल, तुला पैसे देतो. पुढचं आम्ही बघून घेऊ,’ अशी ऑफर दोन व्यक्तींनी आमदारांच्या वाहनचालकाला दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे का, याचा तपास सुरू केला आहे. (Maharashtra Politics)
आमदाराच्या चालकाला पैशांचे आमिष
ही घटना सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी श्रीशैल हुळळी आणि फुलारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे विद्यमान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आले. (Maharashtra Politics)
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी चालक आनंद सुरवसे हे वाहनाजवळ थांबले होते. याचदरम्यान आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे त्यांच्याजवळ आले. (Maharashtra Politics)
‘आम्ही पैसे देतो, आमदाराला गोळ्या घाल’
आरोपींनी चालक आनंद सुरवसे यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. ‘तुला पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल. पुढचं आम्ही बघून घेऊ. यात तुझाच फायदा आहे,’ अशा आशयाची ऑफर दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Politics)
मात्र, चालक आनंद सुरवसे यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. (Maharashtra Politics)
Bjp Leader : भाजपच्या तडफदार तरुण नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा
पोलिसांकडून तपासाला सुरुवात
या धक्कादायक प्रकारानंतर आनंद सुरवसे यांनी सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून श्रीशैल हुळळी आणि फुलारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्यामागे नेमका उद्देश काय होता, आरोपींनी स्वतःहून हा प्रकार केला की त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. (Maharashtra Politics)
भाजपच्या विद्यमान आमदाराला लक्ष्य करण्यासाठी थेट त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याची घटना समोर आल्याने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)






