Pune News : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; फरार ‘रिलस्टार’ रोहन जाधव अटकेत
Pune News : पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक

Pune News : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील फरार आरोपी रोहन रामेश्वर जाधव (वय २६) याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News)
या गुन्ह्यात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली असून रोहन हा टोळीचा प्रमुख साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपींनी फिर्यादीला सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांच्या आधारकार्डाच्या आधारे बनावट बँक खाते उघडण्यात आल्याचा दावा केला. (Pune News)
त्या खात्याचा संबंध एका आर्थिक गुन्ह्याशी जोडून फिर्यादीला अटक होईल तसेच कुटुंबीयांनाही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविण्यात आली. त्यानंतर “चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित खात्यांमध्ये जमा करा,” असे सांगून २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये १०.७४ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. (Pune News)
तपासात फिर्यादीने ३० जानेवारी रोजी एक.. भरलेले ७५ लाख रुपये पुढे विविध खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेज, सायबर क्राईम पोर्टलवरील माहिती आणि बँक व्यवहारांच्या विश्लेषणातून यापूर्वी हर्षद धनतोले, समर्थ देशमुख, अमर अत्तरगी आणि प्रणव आर्या या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत रोहन जाधव हा प्रमुख साथीदार असल्याचे समोर आले. (Pune News)
तपासादरम्यान रोहन जाधवने वापरलेल्या बँक खात्यांचा संबंध २९ सायबर फसवणूक गुन्हे आणि एनसीआरपी तक्रारींशी असल्याचे आढळले. त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हाँगकाँगमधील संशयित आरोपींशी संपर्क असल्याचाही तपासात उलगडा झाला. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी पिंपळे गुरव येथून त्याला अटक केली. (Pune News)
रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून २०२२ पासून पिंपळे निलख येथे राहत होता. तो बी. एस्सी. शिक्षित असून सोशल मीडियावर ‘रिलस्टार’ म्हणून सक्रिय होता. (Pune News)
या प्रकरणात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच फसवणुकीची रक्कम ५,४३६ विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास वरिष्ष निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत. (Pune News)





