Resignation of Congress Leader : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीला मोठा धक्का (Resignation of Congress Leader) बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि APCC सचिव जोन्सन जे. संगमा (Jonson J. Sangma) यांनी सर्व पदांवरून आणि प्राथमिक सदस्यत्वावरून राजीनामा दिला आहे. १२ मार्च २०२६ रोजी APCC अध्यक्षांना लिहिलेल्या राजीनामा (Resignation of Congress Leader) पत्रात त्यांनी पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पक्ष नेतृत्व आणि सहकाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांत मिळालेल्या विश्वास आणि पाठबळाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. २५ वर्षांचा काँग्रेसमधील प्रवास संपुष्टात जोन्सन संगमा यांनी २००१ साली इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुमारे दोन दशकांहून अधिक काळ ते पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय राहिले. या काळात त्यांनी आसाममध्ये पक्षाच्या विविध स्तरांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अलीकडील पद : आसाम प्रदेश काँग्रेस कमिटी (APCC) चे सचिव. २०२१ ते २०२६ : APCC च्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष. या पदांवर असताना त्यांनी संघटनात्मक कामांबरोबरच जनसंपर्क, ग्राउंड लेव्हल उपक्रम आणि पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्यभरातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि लोकांशी जवळून काम करण्याची संधी मिळाली, ज्याचा अनुभव आणि शिकवण पुढील आयुष्यात उपयुक्त ठरेल, असे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. Resignation of Congress Leader सार्वजनिक प्रशासनातील अनुभव पक्षीय कामाबरोबरच संगमा यांना स्थानिक प्रशासनाचा देखील अनुभव आहे. २००६ ते २०१० या काळात त्यांनी राभा हसोंग ऑटोनॉमस कौन्सिलचे कार्यकारी सदस्य म्हणून काम केले. या काळात राभा हसोंग परिसरातील विकास, स्थानिक समस्या आणि समाजाशी निगडित मुद्द्यांवर त्यांनी सक्रियपणे काम केले. राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ अचानक दिलेल्या या राजीनाम्याने आसामच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा फटका मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संगमा यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. काही सूत्रांनी त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेचा उल्लेख केला आहे, मात्र याबाबत संगमा यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हे पण वाचा : LPG Shortage : गॅस मिळत नाही आता नो प्रॉब्लेम; फक्त ‘हे’ काम करा झटक्यात मिटेल टेन्शन