LPG Shortage : गॅस मिळत नाही आता नो प्रॉब्लेम; फक्त ‘हे’ काम करा झटक्यात मिटेल टेन्शन
इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळे (LPG Shortage) पश्चिम आशियातील स्थिती अस्थिर झाली आहे. भारत एलपीजीच्या (LPG Shortage) सुमारे ६०% गरजा आयात करतो, त्यापैकी ९०% पेक्षा जास्त होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो.

LPG Shortage : इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळे (LPG Shortage) पश्चिम आशियातील स्थिती अस्थिर झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद केल्याने आखाती देशांकडून येणारा कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि विशेषतः एलपीजी (LPG) चा पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे.
भारत एलपीजीच्या (LPG Shortage) सुमारे ६०% गरजा आयात करतो, त्यापैकी ९०% पेक्षा जास्त होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. या बंदीमुळे देशात एलपीजीची टंचाई जाणवू लागली आहे. एलपीजी, एलएनजीच्या पुरवठ्यात अडचणी येत असून, काही ठिकाणी काळ्या बाजारात सिलिंडर विक्री वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यास तक्रार कुठे करावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एलपीजी सिलिंडर (LPG Shortage) बुकिंग नियमात बदल LPG Shortage
सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि होर्डिंग रोखण्यासाठी, आता एक सिलिंडर डिलिव्हरीनंतर दुसरा बुक करण्यासाठी किमान प्रतीक्षा कालावधी वाढवला आहे.
- शहरी भागात : आधी २१ दिवसांची मर्यादा होती, आता ती २५ दिवसांची करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागात : आधी २५ दिवस होती, आता ती ४५ दिवसांची करण्यात आली आहे.
हा बदल तात्पुरता असून, पुरवठा स्थिर होईपर्यंत लागू राहणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नागरिकांना पॅनिक बुकिंग टाळण्याचे आवाहन केले आहे. घरगुती वापरासाठी एलपीजी प्राधान्याने पुरवठा वाढवण्यासाठी रिफायनरीजला निर्देश देण्यात आले आहेत.
एलपीजी सिलिंडर वेळेवर मिळत नसेल तर तक्रार कशी आणि कुठे करावी?
एलपीजी डिलिव्हरीत विलंब, अतिरिक्त पैसे मागणे, किंवा इतर समस्या असल्यास तुम्ही संबंधित कंपनीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. सर्व कंपन्यांसाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत:
HP Gas (हिंदुस्तान पेट्रोलियम) ग्राहकांसाठी :
- टोल-फ्री हेल्पलाइन: 1800-2333-555
- HP Anytime LPG: 9493602222 (तक्रार आणि बुकिंगसाठी)
- आणीबाणी (लीकेज): 1906
Bharat Gas (भारत पेट्रोलियम) ग्राहकांसाठी :
- टोल-फ्री हेल्पलाइन: 1800-22-4344
- LPG बुकिंग आणि तक्रार: 7715012345
- आणीबाणी (लीकेज): 1906
Indian Gas (इंडियन ऑइल) ग्राहकांसाठी
- टोल-फ्री हेल्पलाइन: 1800-2333-555
- LPG बुकिंग आणि तक्रार: 7718955555
- आणीबाणी (लीकेज): 1906
या क्रमांकांवर कॉल करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुमचा कंझ्युमर नंबर (LPG ID) आणि समस्या सविस्तर सांगा. अनेक कंपन्यांकडे ऑनलाइन पोर्टल आणि WhatsApp सुविधाही उपलब्ध आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न
सरकारने घरगुती एलपीजीसाठी पुरवठा वाढवला असून, व्यावसायिक वापरासाठी (रेस्टॉरंट्स, हॉटेल्स) काही राज्यांत तात्पुरते निर्बंध घातले आहेत. काही देशांतून इंडिया-फ्लॅग्ड जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यात येत असल्याच्या बातम्या आहेत. तरीही, नागरिकांनी अनावश्यक पॅनिक टाळावे आणि आवश्यकतेनुसारच बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा : Iran US conflict: इराणमधील शाळेवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चीनची मदत; पीडित कुटुंबांना थेट खात्यात पैसे






