#RepublicDay2020 : राजपथावर शक्ती आणि सांस्कृतीचे दर्शन
Updated On:

नवी दिल्ली : भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजपथावर देशाच्या सामर्थ्याचे आणि सांस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ आणि भारतीय सैन्य दलांचे जवान आपले सामर्थ्य जगाला दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.





