रवींद्र वायकरांना दिलासा! ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून मिळाली क्लीन चीट

Ravindra Waikar| शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या काही मतांनी विजय मिळवला. मात्र या निवडणूकीनंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. यादरम्यान आता रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
गैरसमजातून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तेव्हा रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. Ravindra Waikar|
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तिकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. परंतु खूप कमी फरकाने ही निवडणूक वायकर यांनी जिंकली. Ravindra Waikar|
हेही वाचा:





