Sanjay Raut : पीआर मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने राज्यासह देशात मोठी खळबळ उडवून दिली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणात अनेक आरोप करण्यात आले होते. तिची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. तसेच दिशाच्या मृत्यूप्रकरणात केलेले आरोप निराधार असल्याचे एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट मिळाली आहे. या प्रकरणी आता उबाठाचे नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिनचीटचा रिपोर्ट आला आहे. ही आत्महत्याच आहे, असे म्हणत एका तरुण नेत्याला घेरलं बदनाम केलं पण आम्ही मागे हटलो नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे थोडीशी देखील नैतिकता असेल तर आदित्य ठाकरेंची माफी मागा, असे संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना यांना म्हटले आहे. नितेश राणेंवर टीका या प्रकरणावर सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील बोलताना राऊतांनाी जोरदार निशाणा साधला आहे. राणेंचा मुलगा आहे ना. तो एवढा एवढा, त्याला टिल्या म्हणतात. तो मंत्री आहे, असे राऊत म्हणाले आहेत. नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले आहेत. सज्जड इशारा यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करता तुम्ही. पण लक्षात ठेवा तुमच्यावर एक दिवस डाव उलटला जाईल. तेव्हा आम्ही पाहू असा सज्जड इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. हेही वाचा : “…डोक्यात हवा गेली होती”; निलेश साबळेला राशीचक्रकार शरद उपाध्येंनी सुनावले खडेबोल