Nagar | भंडारादरा, मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाणी सोडा
Updated On:

नगर (प्रतिनिधी) – भंडारदरा आणि मुळा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पीकांना पाण्याची मोठी गरज आहे.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नही काही गावात अद्यापही भेडासावत असल्याने अनैक गावातून तसेच शेतकरी वर्गाकडून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.
शुक्रवार (दि. १६) रोजी जिल्हाधिकरी कार्यालयात मंत्री विखे पाटील यानी भंडारादरा आणि मुळा धरणातील पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून दोन्ही धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून शनिवारीच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आवर्तन सोडण्याच्या निर्णयाने दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील खरीप पीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.





