Nagar : मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुटले

नेवासा : नेवासा तालुक्याला वरदान ठरलेले मुळा धरणाचे आवर्तन रविवारी (दि.२७) सायंकाळी सहा वाजता सोडल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली धरणामधून शेतकऱ्यांसाठी पाटपाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाटपाण्यासाठी शेतकऱ्यांची नेवासा तालुक्यामध्ये मागणी होत होती. त्याचअनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पाठपुरावा केला असल्यामुळे हे आवर्तन सोडण्यात आले. आमदार लंघे यांच्या मागणीच्या धर्तीवर काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाची बैठक बोलावून पाटपाण्याच्या संदर्भात नियोजन केलेले होते.
त्या बैठकीला आमदार लंघे उपस्थित होते. विखे पाटील यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की,आमदार लंघे म्हणतील, त्याप्रमाणे पाटपाण्याचे नियोजन करा. त्याच अनुषंगाने रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळा धरणामधून आवर्तन सोडल्याची माहिती लंघे यांनी दिली. यापाण्यामुळे ऊस, बाजरी, मका, भुईमूग तसेच फळबागांना मोठा दिलासा मिळणार आहे.





