उपमुख्यमंत्री कार्यालयात होणार 6 कर्मचाऱ्यांची भरती
Updated On:

पुणे – मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यात येणार आहे.
मागील सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री हे पद नव्हते. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता नव्याने उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयासाठी ही पदे विविध आस्थापनेवरील घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.





