Parliament session : संसद अधिवेशनाची समाप्ती न होण्याचा विक्रम; ८७ दिवसांचा मागील रेकॉर्ड मोडीत
संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ते अधिवेशन अद्याप औपचारिकरित्या समाप्त केलेले नाही.

Parliament session – संसदेचे पावसाळी अधिवेशन ८८ दिवसांचा कालावधी उलटूनही औपचारिकरित्या समाप्त झालेले नाही. त्यामुळे अधिवेशनाची समाप्ती न होण्याचा वर्ष २००८ मधील ८७ दिवसांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ते अधिवेशन अद्याप औपचारिकरित्या समाप्त केलेले नाही.
त्यामुळे संबंधित अधिवेशनाच्या आणखी बैठका बोलावण्याची शक्यता खुली राहिली आहे. तशा बैठका बोलावण्यासाठीची सूचना दोन दिवस आधी दिली तरी चालू शकते. त्याउलट, नवे अधिवेशन बोलावण्यासाठी किमान १४ दिवस आधी सूचना द्यावी लागते.
दरम्यान, विक्रमी कालावधीसाठी अधिवेशनाची समाप्ती झाली नसल्याने प्रस्तावित घटनादुरूस्ती विधेयक मांडण्यासाठी केंद्र सरकार आणखी बैठका बोलावण्याचे पाऊल उचलू शकते, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना खतपाणी मिळाले आहे. ते विधेयक महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित असेल.
ते लोकसभेच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाशी जोडलेले असेल. संबंधित उद्देशातून याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी घटनादुरूस्ती विधेयक मांडण्यात आले. मात्र, लोकसभेत सरकार पुरेसे संख्याबळ गाठू न शकल्याने ते मंजूर झाले नाही.






