Turkey cop-31 climate : कॉप-३१ ने वातावरणाबाबतच्या उपाययोजनांना वेग द्यावा.! तुर्कीयेमध्ये जागतिक वातावरण बदल विषयक परिषदेला प्रारंभ
स्टीएल यांनी तापमानवाढीचे दुष्परिणाम, हिमालयात हिमतलाव फुटण्याने येणारे पूर आणि सुपर अल निनोच्या धोक्यांच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. जागतिक तापमानवाढ सातत्याने विनाशकारी होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Turkey cop-31 climate – लाचालरण बदलाचे गंभीर परिणाम सर्वजगभर दिसायला लागले आहेत. या गंभीर परिणामांमुळे सर्व जगभरातील समाजाला धोका उत्पन्न झाला आहे. त्याच या पार्श्वभुमीर होत असलेल्या कॉप-३१ या जागतिक वातावरण बदल विषयक परिषदेने वास्तववादी उपाय योजाना वेगाना राबवायला हव्यात, असे संयुक्त राष्ट्राच्या वातावरण बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमोन स्टिएल यांनी आज केले.
सामूहिक कृती सुरू करणे हीच यावेळची तातडीची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तुर्कीयेत अंताल्या येथे आजपासून सुरू होत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या वातावरण बदलविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करत होते.
स्टीएल यांनी तापमानवाढीचे दुष्परिणाम, हिमालयात हिमतलाव फुटण्याने येणारे पूर आणि सुपर अल निनोच्या धोक्यांच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. जागतिक तापमानवाढ सातत्याने विनाशकारी होत आहे, असे त्यांनी सांगितले.
जागतिक तापमानवाढीचा फटका संपूर्ण पृथ्वीला बसतो आहे. या आपत्तीचा फटका सर्व भूभागातील समुदायांना बसतो आहे. सर्व समुदाय आणि अर्थकारणांना जाळणाऱ्या वातावरणाच्या या आगीमध्ये अल निनोकडून तेल ओतले जाते आहे.
सर्वत्र दुर्बळ घटकांना सर्वाधिक किंमत मोजावी लागते आहे आणि घोर अन्याय आपल्या ऐक्याला व सामूहिक प्रगतीला धोका निर्माण करत आहे, असे स्टिएल यांनी कॉप-३१ मध्ये सहभागी झालेल्यांना सांगितले.
सर्व जगाने स्वच्छ ऊर्जा आणि हवामान लवचिकतेचा स्वीकार केला पाहिजे, हे आता प्रामाणिकपणे मनापासून स्वीकारले गेले पाहिजे. हे परिवर्तन आता प्रत्येक देशाच्या हिताचे आहे. यामुळेच जागतिक तापमानवाढीला नियंत्रित केले जाऊ शकेल आणि समुदाय आणि अर्थकारणांचे रक्षण होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
स्टीएल यांनी जैवइंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन देखील केले. तसेच नवीकरणीय इंधनाचा अर्थकारणाला होणाऱ्या फायद्यावरही प्रकाश टाकला. पण आर्थिक जबाबदाऱ्या अजून बाकी आहेत. या संदर्भात अनेक देशांकडून अर्थसंकल्पाबाबतची चर्चा आगामी ६ महिने होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
संवाद, विश्वा आणि स्रोत वाढले पाहिजेत, ही अंताल्याची कॉप-३१ कडून अपेक्षा असल्याचे यजमान तुर्कीयेचे पर्यावरण आणि शहरी नियोजन मंत्री मुरत कुरुम यांनी सांगितले.






