Diwali 2026 : भाऊबीजेचं गिफ्ट ठरलंय का? पैशांचं पाकीट सोडा, कमी पैशांत द्या हटके भेटवस्तू, वाचा खास यादी !
भाऊबीज जवळ आली आहे आणि तुमच्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं, याचा विचार सुरू झाला असेल, तर महागड्या भेटवस्तूंवर पैसे खर्च करण्याऐवजी त्यांच्या आवडीच्या काही हटके आणि उपयोगी गोष्टी निवडा.

Diwali 2026 : भावंडांचं नातंच असं असतं की, कधी छोट्या गोष्टीवरून तासन्तास भांडणं, तर कधी एकमेकांशिवाय क्षणभरही न राहणं! पण बाहेरचं संकट आलं की सर्वात आधी धावून येतं ते आपलंच भाऊ किंवा बहीण! याच गोड नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी साजरी करणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला प्रेमाने भेट देत तिच्या पाठीशी कायम उभं राहण्याचं आश्वासन देतो.
आता भाऊबीज जवळ आली आहे आणि तुमच्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं, याचा विचार सुरू झाला असेल, तर महागड्या भेटवस्तूंवर पैसे खर्च करण्याऐवजी त्यांच्या आवडीच्या काही हटके आणि उपयोगी गोष्टी निवडा. तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या या गिफ्ट आयडिया नक्कीच चेहऱ्यावर हसू आणतील!
लाडक्या भावासाठी हटके गिफ्ट आयडिया :
१. कुर्ता आणि कोरियन पँट्स
तुमच्या भावाला फॅशनची आवड असेल आणि नेहमीच्या जीन्स-टीशर्टपेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर कुर्ता आणि कोरियन पँट्सची जोडी उत्तम पर्याय ठरू शकते. सणासुदीला, मित्रांसोबत बाहेर जाताना किंवा एखाद्या खास कार्यक्रमात हा इंडो-वेस्टर्न लूक त्याला उठून दिसायला मदत करेल.
२. आवडीचा परफ्युम
दिवसभर फ्रेश आणि प्रसन्न वाटावं, असं कोणाला वाटत नाही? भावाला त्याच्या आवडीच्या सुगंधाचा परफ्युम भेट देऊ शकता. ऑफिस, कॉलेज, पार्टी किंवा प्रवासातही तो वापरता येईल. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणि आवडीला साजेसा सुगंध निवडला.
३. स्टायलिश घड्याळ
फॅशन आणि उपयोगिता यांचा सुंदर मेळ साधणारी भेट म्हणजे घड्याळ! भावाच्या कपड्यांच्या स्टाइलनुसार क्लासिक, स्पोर्टी किंवा इंडो-वेस्टर्न डिझाइनचं घड्याळ निवडता येईल. कॅज्युअल कपडे असोत किंवा पारंपरिक पोशाख, योग्य घड्याळ प्रत्येक लूकला वेगळीच शोभा आणतं.
४. छोट्या कार आणि बाईकचं कलेक्शन
तुमच्या भावाला कार किंवा बाईक्सची विशेष आवड आहे का? मग त्याच्यासाठी मिनिएचर कार, बाईक किंवा त्याच्या आवडत्या वाहनाचं मॉडेल गिफ्ट करू शकता. या छोट्या गाड्या तो आपल्या रूममध्ये किंवा शोकेसमध्ये सजवून ठेवू शकतो. विशेषतः कलेक्शन करण्याची आवड असणाऱ्या भावासाठी ही भन्नाट भेट ठरू शकते.
५. ग्रूमिंग आणि ट्रॅव्हल केअर किट
भावाला रोजच्या वापरासाठी उपयोगी पडेल असं काही द्यायचं असेल, तर ग्रूमिंग किट हा चांगला पर्याय आहे. त्यामध्ये फेसवॉश, मॉइश्चरायझर, डिओडरंट, दाढीची निगा राखण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि छोटं ट्रॅव्हल पाउच ठेवता येईल.
लाडक्या बहिणीसाठी खास गिफ्ट आयडिया :
१. कुर्ती, प्लाझो सेट किंवा स्टायलिश टॉप
बहिणीला कपड्यांची आवड असेल, तर तिच्या पसंतीचा सुंदर कुर्ती सेट, प्लाझो सेट किंवा ट्रेंडी टॉप भेट देऊ शकता. कॉलेज, ऑफिस किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाताना तिला हे कपडे वापरता येतील.
२. स्किनकेअर आणि मेकअप किट
बहिणीला स्किनकेअर आणि मेकअपची आवड असेल, तर तिच्यासाठी खास गिफ्ट बॉक्स तयार करा. त्यामध्ये फेसवॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम, काजळ, लिपस्टिक किंवा तिच्या आवडीची मेकअप उत्पादने ठेवता येतील. तिच्या त्वचेच्या प्रकाराला आणि वैयक्तिक पसंतीला अनुरूप उत्पादने निवडा.
३. स्टायलिश साईड बॅग
मोबाईल, पाकीट, लिप बाम, एअरफोन्स आणि इतर छोट्या वस्तू सोबत ठेवण्यासाठी साईड बॅग नेहमीच उपयोगी पडते. बहिणीच्या ड्रेसिंग स्टाइलनुसार स्लिंग बॅग, मिनी बॅग किंवा क्लासिक साईड बॅग निवडू शकता. तिच्या आवडीचा रंग आणि डिझाइन निवडलं, तर ही भेट तिला नक्कीच आवडेल.
४. पीरियड्स केअर किट – काळजी व्यक्त करण्याची खास भेट
बहिणीची काळजी घेणं म्हणजे केवळ मोठ्या भेटवस्तू देणं नव्हे, तर तिच्या रोजच्या गरजा समजून घेणंही आहे. यासाठी तिच्या आवडीनुसार खास पीरियड्स केअर किट तयार करू शकता. त्यामध्ये सॅनिटरी पॅड्स किंवा ती वापरत असलेलं पीरियड प्रॉडक्ट, हॉट वॉटर बॅग, छोटं पाऊच, टिश्यू, वेट वाइप्स आणि डिस्पोजल बॅग्स ठेवता येतील. तिच्या वैयक्तिक पसंतीचा आदर करून तयार केलेलं हे किट तिच्यासाठी उपयोगी आणि जिव्हाळ्याची भेट ठरू शकतं.
५. ज्वेलरी किंवा पर्सनलाइज्ड गिफ्ट
बहिणीला दागिन्यांची आवड असेल, तर तिच्यासाठी सुंदर इअररिंग्स, ब्रेसलेट, पेंडंट किंवा साधीशी चेन निवडू शकता. याशिवाय तिच्या नावाचं की-चेन, फोटोफ्रेम, खास आठवणींचा फोटो अल्बम किंवा दोघांच्या जुन्या फोटोंचा छोटा कोलाजही भेट देऊ शकता. अशा वैयक्तिक भेटवस्तूंची किंमत पैशांत मोजता येत नाही; कारण त्यामागे असलेली आठवण आणि भावना अधिक महत्त्वाची असते.






