Smartphone Offers: नववर्ष नवीन स्मार्टफोन! किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

Best Smartphones Under 15000 : भारतीय बाजारात 15 ते 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला मोठी मागणी आहे. त्यामुळे कंपन्यांकडून देखील याच बजेटमध्ये येणारे स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात लाँच केले जातात. तुम्ही देखील 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 6000mAh बॅटरीसह येणारे हँडसेट शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशा स्मार्टफोनची लिस्ट घेऊन आलो आहेत.
या बजेटमध्ये तुम्ही रियलमी, सॅमसंग सारख्या कंपन्यांचे फोन खरेदी करू शकता. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Realme 14x 5G
रियलमीच्या या फोनचे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 15,301 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर 2 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बँक ऑफर्सचाही फायदा मिळेल. फोनमध्ये 6.67 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची दमदार बॅटरी मिळते.
Samsung Galaxy M35 5G
सॅमसंगच्या या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे. फोनचे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येणारे व्हेरिएंट या किंमतीत खरेदी करू शकता. फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आणि Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळेल. यात सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.
iQOO Z9x 5G
iQOO Z9x 5G च्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटला डिस्काउंटसह 12,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर 2 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर्सचा फायदा मिळतो. iQOO च्या या फोनमध्ये 6.72 इंच डिस्प्ले, 4nm स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर आणि 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.





