15 हजारांच्या बजेटमध्ये आला रियलमीचा जबरदस्त फोन, 50MP कॅमेरा-6000mAh बॅटरी सह मिळेल बरंच काही

Realme P3x 5G Launched | रियलमीने भारतात P3-Series मधील स्मार्टफोन Realme P3x 5G ला लाँच केले आहे. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये या फोन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 6000mAh बॅटरी, .72 इंच फुलएचडी+ डिस्प्ले आणि और 50MP प्रायमरी रियर कॅमऱ्यासह अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Realme P3x 5G ची किंमत
कंपनीने Realme P3x 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलला 13,999 रुपये किंमतीत लाँच केले आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. फोनची रियलमी वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवरून 28 फेब्रुवारीपासून विक्री सुरू होईल. बँक ऑफरसह ग्राहक दोन्ही व्हेरिएंट्सवर 1000 रुपयांची सूट मिळेल.
Realme P3x 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme P3x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच फुलएचडी+ स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन 2400 × 1080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आणि टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्झ आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 6nm प्रोसेसर आणि आर्म माली-G57 MC2 GPU दिले आहे.
यात 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2 टीबीपर्यंत वाढवू शकता. यात 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, धुळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी फोनला IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर फोनमध्ये अपर्चर एफ/1.8 सह 50 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 80211 एसी, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्ट दिला आहे.





