RCB W vs GG W : आरसीबीने साधली विजयाची हॅट्ट्रिक! गुजरातचा धुव्वा उडवत ठरला नंबर-१; श्रेयंका-राधा ठरल्या गेमचेंजर

RCB beat GG by 32 Runs : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मधील हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गुजरात जायंट्सचा ३२ धावांनी पराभव केला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरातचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत ३ विजयांसह अव्वल स्थान (नंबर १) गाठले आहे. या विजयात राधा यादव आणि श्रेयंका पाटीलने महत्वाची भूमिका बजावली.
आरसीबीच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा –
गुजरात जायंट्सची कर्णधार अॅश्ले गार्डनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ७ बाद १८७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये राधा यादवने सर्वाधिक धावांची खेळी साकारली. तिने ४७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी साकारली. तसेच रिचा घोषने २८ चेंडूंत ४४ धावांची खेळी साकारली. गुजरातकडून सोफी डिव्हाइन ३ आणि काश्वी गौतमने २ विकेट्स घेतल्या.
All smiles in the @RCBTweets camp ❤️
Still unbeaten and still 🔝 of the points table! 👏
Scorecard ▶️ https://t.co/HHBOE0REFf #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvGG pic.twitter.com/MpHcHp6wuy
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 16, 2026
प्रत्युत्तरात आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. त्यांच्याकडून भारती फुलमालीने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. विशेष म्हणजे निम्म्या संघाने एकट्या श्रेयंका पाटीलसमोर गुडघे टेकले. यानंतर गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १५० धावांवर गारद झाला.
हेही वाचा – Shivani Singh Catch : WPL मध्ये ‘सुपरवूमन’ची एन्ट्री! पदार्पणातच शिवानी सिंगचा थक्क करणारा कॅच, पाहा VIDEO
स्मृती ब्रिगेडचा ‘नंबर १’ वर कब्जा –
या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन विजय होते. मात्र, आजच्या विजयानंतर आरसीबीचे ६ गुण झाले असून त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ यंदा अत्यंत संतुलित आणि फॉर्मात दिसत आहे.
पदार्पणवीर शिवानी सिंगने वेधलं लक्ष्य
गुजरातचा पराभव झाला असला, तरी या सामन्यात गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या शिवानी सिंगची चर्चा सर्वाधिक झाली. तिने क्षेत्ररक्षण करताना टिपलेला तो अविश्वासनीय ‘वन हँडेड’ कॅच आजही चाहत्यांच्या लक्षात राहील.





