Shivani Singh Catch : WPL मध्ये ‘सुपरवूमन’ची एन्ट्री! पदार्पणातच शिवानी सिंगचा थक्क करणारा कॅच, पाहा VIDEO

Shivani Singh Catch Video Viral : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये बुधवारी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात रंगलेल्या सामन्यात एका नवीन ताऱ्याचा उदय झाला आहे. गुजरात जायंट्सकडून पदार्पण करणाऱ्या शिवानी सिंगने मैदानात अशी काही चपळाई दाखवली की, संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झाले. एका हाताने टिपलेल्या अद्भूत कॅचमुळे शिवानी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवानी सिंगची चित्तथरारक फिल्डिंग –
आयुषी सोनीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शिवानी सिंगने आपल्या पहिल्याच सामन्यात दबावावर मात केली. डी. वाय. पाटील स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करताना शिवानीने हवेत झेप घेत एका हाताने अशक्य वाटणारा झेल टिपला. हा कॅच पाहून मैदानातील प्रेक्षक आणि समालोचकांनीही डोक्यावर हात लावला. सोशल मीडियावर चाहते तिची तुलना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांशी करत असून तिला गुजरातची ‘संकटमोचक’ म्हणत आहेत.
Putting on a show! 🫴🔥
🎥 Same fielding position, two spectacular grabs, ft. Shivani Singh and Rajeshwari Gayakwad 👏
Updates ▶️ https://t.co/HHBOE0REFf #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvGG pic.twitter.com/iD9PXcFY5E
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 16, 2026
गार्डनरचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय –
गुजरात जायंट्सची कर्णधार अॅश्ले गार्डनरने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी पडणारे दव (Dew) आणि मैदानाची लहान आकाराची सीमा पाहता धावांचा पाठलाग करणे सोपे जाईल, असे गार्डनरने नमूद केले. दुसरीकडे, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने सांगितले की, टॉस हरल्याचे दुःख नाही आणि आमचा संघ कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे. त्यानुसार आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
नंबर एकच्या मुकुटासाठी लढत
हा सामना केवळ विजयासाठी नसून गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी आहे. सध्या आरसीबी (प्रथम स्थान) आणि गुजरात जायंट्स (तिसरे स्थान) या दोन्ही संघांकडे प्रत्येकी दोन विजय आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ तीन विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये ‘किंग’ ठरेल.





