RCB vs PBKS सामन्यात पावसाचा अडथळा! IPL 2025 मध्ये पावसाशी संबंधित काय आहेत नियम? जाणून घ्या

RCB vs PBKS IPL 2025 rain delay rules : आयपीएल २०२५ च्या हंगामात आतापर्यंत काही सामने रोमांचक झाले आहेत, तर काही सामने एकतर्फी झाले आहेत. सुपर ओव्हरही पाहिली आहे. पण पहिल्या ३३ सामन्यांमध्ये एक गोष्ट दुर्लक्षित राहिली ती म्हणजे पाऊस. आयपीएलच्या १८ व्या हंगामात आतापर्यंत हवामानाचा हस्तक्षेप दिसून आला नव्हता पण ३४ व्या सामन्यात ही कमतरताही पूर्ण झाली. आरसीबी आणि पीबीकेएस सामन्याच्या नाणेफेकीला पावसामुळे उशीरा झाला. अशा वेळी, पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आयपीएल मध्ये विलंब झाल्यास काय नियम आहेत? जाणून घेऊया.
हा आयपीएलचा १८ वा हंगाम आहे आणि जवळजवळ प्रत्येक हंगामात पावसामुळे एक किंवा दोन सामने प्रभावित होतात. आयपीएल २०२५ च्या पहिल्या ३३ सामन्यांपर्यंत, खेळाडू, चाहते आणि आयोजकांना या बाबतीत कोणतीही अडचण आली नाही. पण १८ एप्रिल रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या ३४ व्या सामन्यापूर्वी पावसामुळे एका पूर्ण सामन्याच्या आशा धुळीस मिळाल्या. पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही तर टॉसही वेळेवर होऊ शकला नाही.
Toss in Bengaluru has been delayed due to rain 🌧
Stay tuned for further updates #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/S2b3uu9ILC
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
पावसामुळे होणाऱ्या विलंबाबद्दल काय नियम आहेत?
पावसामुळे सामन्यावर परिणाम होणे निश्चित आहे आणि पूर्ण २०-२० षटके खेळणे कठीण होते. अशा परिस्थितीत, सामना पूर्ण करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. जे खालीलप्रमाणे आहेत.
हेही वाचा – MI vs SRH : विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा बॉलरला का? वरुण चक्रवर्तीने उपस्थित केला मोठा सवाल
- यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आयपीएलच्या लीग स्टेज सामन्यांसाठी राखीव दिवस नसतो. म्हणजे जर पावसामुळे सामना खेळवता आला नाही, तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळवला जाणार नाही.
- आयपीएल २०२५ मधील लीग स्टेज सामने दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होत आहेत. जर पावसामुळे कोणताही सामना उशिरा सुरू झाला तर एका तासानंतर षटके कमी करण्यास सुरुवात होते.
- टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणेच, आयपीएलमध्येही सामना निकाली काढण्यासाठी किमान ५-५ षटकांचा सामना आवश्यक असतो. यासाठी, एक कट-ऑफ वेळ निश्चित केली जाते, ज्या वेळेपर्यंत सामना सुरू झाला पाहिजे.
- संध्याकाळच्या सामन्यासाठी, नाणेफेक रात्री १०:४१ वाजता होणे आवश्यक आहे आणि सामना रात्री १०:५६ वाजता सुरू होणे आवश्यक आहे.
- जर या वेळेपर्यंत सामना सुरू झाला नाही किंवा सामना सुरू झाल्यानंतर पावसामुळे पुन्हा विलंब झाला, तर सामना रद्द घोषित केला जाईल.
- जर सामना रद्द घोषित झाला तर कोणत्याही संघाला २ गुण मिळणार नाहीत, त्याऐवजी दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल.





