RCB vs MI : थरारक सामन्यात मुंबईचा ‘गेम ओव्हर’! शेवटच्या चेंडूवर आरसीबीने मारली बाजी; क्रृणाल-भुवनेश्वर ठरले ‘गेमचेंजर’
RCB vs MI : या पराभवासोबतच पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे या हंगामातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.

RCB vs MI Royal Challengers Bengaluru won : आयपीएल २०२६ च्या ५४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI) एका श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात २ गड्यांनी पराभव केला. या पराभवासोबतच पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे या हंगामातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबीने १६७ धावांचे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर गाठत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले आहे.
भुवनेश्वरचा भेदक मारा, मुंबईची पडझड –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अनुभवी भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीने मुंबईच्या आघाडीच्या फळीचे कंबरडे मोडले. त्याने ३ षटकांच्या आत रोहित शर्मा (२२ धावा) आणि सूर्यकुमार यादव यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून मुंबईला बॅकफूटवर ढकलले. मात्र, नमन धीर आणि तिलक वर्मा यांनी ८२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. तिलक वर्माने झुंजार अर्धशतक झळकावले, परंतु १८ व्या षटकात भुवनेश्वरने पुन्हा एकदा तिलकला बाद करत मुंबईला १६६ धावांवर रोखले. भुवनेश्वरने आरसीबीसाठी सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
#RCB fans, how are the nerves now? 😅❤️
🎥 An 𝗮𝗯𝘀𝗼𝗹𝘂𝘁𝗲𝗹𝘆 𝗺𝗶𝗻𝗱-𝗯𝗹𝗼𝘄𝗶𝗻𝗴 finish in Raipur takes @RCBTweets to the 🔝 of the points table 🔢👏
Scorecard ▶️ https://t.co/wYlCB10dhm#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvMI pic.twitter.com/BcYyHO01gB
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
क्रुणाल पंड्या ठरला विजयाचा शिल्पकार –
Standing tall when needed 🫡
Krunal Pandya with his 3️⃣rd #TATAIPL fifty to lead #RCB‘s chase 👏
Updates ▶️ https://t.co/wYlCB10dhm#KhelBindaas | #RCBvMI | @RCBTweets | @krunalpandya24 pic.twitter.com/SM6tp474Bl
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्थाही बिकट झाली होती. दीपक चहरने आपल्या पहिल्याच षटकात विराट कोहलीला शून्यावर बाद केले, तर रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कलही स्वस्तात बाद झाले. अशा स्थितीत क्रुणाल पंड्या आणि जेकब बेथेल यांनी डाव सावरला. क्रुणालने पायाला क्रॅम्प असतानाही ३२ चेंडूत अर्धशतक झळकावत किल्ला लढवला.
शेवटच्या षटकाचा थरार –
WHAT ON EARTH HAVE WE JUST WITNESSED! 🤯
Bhuvneshwar Kumar & Rasikh Dar, take a bow ❤️
Updates ▶️ https://t.co/wYlCB10dhm#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvMI | @RCBTweets pic.twitter.com/tqkuPMEsHR
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
शेवटच्या षटकात आरसीबीला १५ धावांची गरज होती. राज अंगद बावाच्या या षटकात रोमारियो शेफर्ड बाद झाला, पण भुवनेश्वर कुमारने मैदानात येताच षटकार खेचून सामना आरसीबीच्या बाजूने झुकवला. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रसीख सलामने दोन धावा धावून पूर्ण केल्या आणि आरसीबीला रोमांचक विजय मिळवून दिला.





