Bengaluru Stampede : RCB ची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबांना 10 लाखांची मदत जाहीर

Bengaluru Stampede RCB Announces 10 Lakh Aid for Victims : आरसीबीने आयपीएल २०२५ च्या विजयानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या ११ चाहत्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत ३३ हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांच्यासाठी ‘आरसीबी केयर्स’ नावाचे विशेष निधी स्थापन करण्याची घोषणाही फ्रँचायझीने केली आहे.
आरसीबीकडून मृतांच्या ११ कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर –
ही दुर्घटना बुधवारी (४ जून) विजयी जल्लोषादरम्यान घडली, जेव्हा लाखो चाहते विराट कोहली आणि आरसीबीच्या खेळाडूंना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. यानंतर आरसीबीने गुरुवारी जारी केलेल्या आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “बंगळुरूमधील ही दुर्दैवी घटना आरसीबी कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी आहे. आदर आणि एकजुटीच्या भावनेतून आम्ही मृतांच्या ११ कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करत आहोत. तसेच, जखमी चाहत्यांसाठी ‘आरसीबी केयर्स’ निधी स्थापन केला आहे.”
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
The unfortunate incident in Bengaluru yesterday has caused a lot of anguish and pain to the RCB family. As a mark of respect and a gesture of solidarity, RCB has announced a financial… pic.twitter.com/C50WID1FEI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 5, 2025
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनही १० लाखांची मदत जाहीर –
THIS IS HEARTBREAKING 💔💔
DK Shivakumar broke down in front of the media after Bengaluru stampede.
He felt the pain. He took responsibility.
He didn’t hide. He didn’t blame.
He stood with his people.Karnataka is with you @DKShivakumar 🥹🫡 pic.twitter.com/GRfQfzlJxs
— Amock (@Politicx2029) June 5, 2025
या घटनेमुळे आरसीबीच्या १८ वर्षांच्या आयपीएल विजयाच्या आनंदावर विरजण पडले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीही प्रत्येक मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत आणि जखमींवर मोफत उपचाराची घोषणा केली आहे. या दुर्घटनेसाठी गर्दीचे अपुरे नियोजन आणि सुरक्षेचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. स्टेडियमची क्षमता ३५,००० असताना २-३ लाख चाहते जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
हेही वाचा – French Open 2025 : वाइल्डकार्डची चमत्कारिक झेप; लोइस बोइसनने फ्रेंच ओपनमध्ये रचला इतिहास!
१५ दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश –
DK Shivakumar breaks down!
Bengaluru Stampede
11 dead, all under 40Among the victims: 13-year-old Divyanshi, Shivalinga (17), Bhoomik, Shravan, Prajwal (all 20), Chinmayi (19), Sahana (25), Akshata (27), Devi (29), Doresha (32), and Manoj (33).
A celebration with no clear… pic.twitter.com/HRVt8NBgUr
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 5, 2025
कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी सरकारला नोटीस बजावली असून, १५ दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरसीबीने पोलिसांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून विजयी मिरवणूक काढल्याचा आरोपही होत आहे. ही दुर्घटना टाळता येऊ शकली असती, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आरसीबी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.





