उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का.! सर्वात जवळचा आमदार देणार CM शिंदेंची साथ; आज होणार पक्ष प्रवेश

Ravindra Waikar Join Shiv Sena Shinde Group । शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून गळती होण्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही. अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. । Ravindra Waikar Join Shiv Sena Shinde Group
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं.
वायकर यांच्याविरोधात ईडीकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. रवींद्र वायकर यांची अनेकदा ईडी चौकशीदेखील झाली आहे. रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आता हेच निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाची वर्षा बंगल्यावर जोरदार तयारी सुरु झाली आहे. वायकर यांचा आज रात्री आठ वाजेनंतर वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी वायकर नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. । Ravindra Waikar Join Shiv Sena Shinde Group





