IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयाने भारतीय संघाला फायदा, WTC पॉइंट्स टेबलमध्ये ‘इतके’ वाढले पॉइंट्स परसेंटेज

IND vs WI India beat West Indies : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 140 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. रवींद्र जडेजा, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि मोहम्मद सिराज यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. या विजयासह भारतीय संघाने 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाचा पीसीटी वाढला –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ डब्ल्यूटीसी 2025-27 गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर होता आणि या विजयानंतरही तो तिसऱ्याच स्थानावर कायम आहे. मात्र, या विजयामुळे भारताचा पीसीटी (पॉइंट्स परसेंटेज) 46.67 वरून 55.56 पर्यंत वाढला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामने जिंकले, 2 गमावले, तर 1 सामना अनिर्णित राहिला.
Hugs and smiles all around 😊#TeamIndia celebrate a magnificent victory in Ahmedabad and take a 1-0 lead in the series 👏
Scorecard ▶ https://t.co/MNXdZceTab#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/22q4aUUhqp
— BCCI (@BCCI) October 4, 2025
गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल –
डब्ल्यूटीसी 2025-27 गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांपैकी सर्वच सामने जिंकले असून, त्यांचा पीसीटी 100.00 आहे. दुसऱ्या स्थानावर श्रीलंका संघ आहे. श्रीलंकेने 2 सामने खेळले असून, त्यापैकी 1 जिंकला आणि 1 सामना अनिर्णित राहिला. त्यांचा पीसीटी 66.67 आहे.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा फ्लॉप शो –
𝙒𝙖𝙧𝙧𝙞𝙤𝙧’𝙨 𝙀𝙛𝙛𝙤𝙧𝙩 ⚔
1️⃣0️⃣4️⃣* runs with the bat 👏
4️⃣/5️⃣4️⃣ with the ball in the second innings 👌Ravindra Jadeja is the Player of the Match for his superb show in the first #INDvWI Test 🥇
Scorecard ▶ https://t.co/MNXdZceTab#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xImlHNlKJk
— BCCI (@BCCI) October 4, 2025
पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ पहिल्या डाव अवघ्या 162 धावांवर गारद झाला. त्यानंतर भारतीय संघाने रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 448 धावा उभारल्या आणि 286 धावांची मोठी आघाडी घेतली.
हेही वाचा – IND vs AUS : विराट-रोहितचं पुनरागमन निश्चित! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ‘या’ दिवशी होणार संघाची घोषणा
दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचे फलंदाज रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर तग धरू शकले नाहीत आणि अवघ्या 146 धावांवर त्यांचा डाव आटोपला.या विजयाने भारतीय संघाने केवळ मालिकेत आघाडीच घेतली नाही, तर डब्ल्यूटीसी गुणतक्त्यातही आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या कसोटी सामन्याकडे लागले आहे.





