RCB vs CSK : रवींद्र जडेजाने मारला १०९ मीटरचा उत्तुंग षटकार, स्टेडियमच्या छतावर पडला चेंडू, पाहा VIDEO

Ravindra Jadeja hit 109 meter long six video viral : आयपीएल २०२५ मधील ५२ वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि सीएसके संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा २ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने प्रथम रोमारियो शेफर्डच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयुष म्हात्रेच्या अर्धशतकाच्या जोरावर २११ धावांपर्यंत मजल मारता आली नाही. दरम्यान या सामन्यात रवींद्र जडेजाने एक विक्रमी षटकार मारला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आयुष म्हात्रे व्यतिरिक्त, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजानेही शानदार फलंदाजी केली. १७१.११ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७७ धावांची नाबाद खेळी केली. यातील एक षटकार जडेजाने स्टेडियमच्या छतावर मारला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जडेजाने एनगिडीला १०९ मीटरचा मारला उत्तुंग षटकार –
109m six! 👏
Ravindra Jadeja hit a MONSTROUS maximum during his fighting knock of 77*(45)! 🔥
Watch his full knock▶️ https://t.co/76RyGG8wAn#TATAIPL | #RCBvCSK | @ChennaiIPL | @imjadeja pic.twitter.com/L5Lv6291pT
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
खरंतर, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आरसीबीकडून सीएसकेच्या डावातील १७ वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजा स्ट्राईकवर होता. एनगिडीने जडेजाला फुल टॉस चेंडू टाकला, ज्याचा पुरेपूर फायदा घेत जड्डूने चेंडू डीप स्क्वेअर लेगवर १०९ मीटर लांबीचा उंच षटकार मारला. हा चेंडू एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावर पडला.
हेही वाचा – RCB vs CSK : आरसीबीने रोमांचक सामन्यात सीएसकेला पाजलं पाणी! आयुष म्हात्रेची वादळी खेळी ठरली व्यर्थ
चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. कारण शेख रशीद फक्त १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, सॅम करन देखील मोठी खेळी खेळू शकला नाही आणि ५ धावा करून बाद झाला. पण दोन विकेट पडल्यानंतर, युवा आयुष महात्रे आणि रवींद्र जडेजा यांनी शानदार फलंदाजी केली. प्रथम, दोघांनीही शानदार पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात महात्रेने ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 9 चौकार आणि पाच षटकार मारले.





