raveena tandon: अजय देवगणला लव्ह लेटर्स लिहायची रवीना टंडन? ‘सिंघम’ म्हणाले… ती तर जन्मजात खोटारडी!

raveena tandon : १९९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नवे कलाकार चमकू लागले होते. त्यापैकी दोन लोकप्रिय चेहरे होते अजय देवगण आणि रवीना टंडन. दोघांनी त्या काळात एकत्र काही चित्रपट केले आणि त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले. सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री होती आणि दोघेही एकाच शाळेत शिकले होते. पण पुढे ही मैत्री एका मोठ्या वादात बदलली.
रवीना टंडनचं खुलं विधान
एका मुलाखतीत रवीनाने सांगितले होते की तिच अजय देवगणसोबत अफेअर होत आणि ती त्याला लव्ह लेटर्स लिहायची. हे विधान समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली.
अजय देवगणचा तीव्र प्रतिसाद
अजय देवगण मात्र या बातमीवर खूप नाराज झाले. त्यांनी रवीनाचे सर्व दावे फेटाळून लावत म्हटले, “ती जन्मजात खोटारडी आहे. जर खरंच तिने मला लव्ह लेटर्स लिहिले असतील, तर ते छापून दाखवावेत.”
अजयच्या या वक्तव्यामुळे त्या काळात संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.
नात्यात आली तूट
या वादानंतर अजय आणि रवीनाचे संबंध पूर्णपणे तुटले. त्याच काळात अजय देवगणचे करिश्मा कपूरसोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या, मात्र त्याची अधिकृत पुष्टी कधी झाली नाही.
यानंतर रवीना टंडनने स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि ‘मोहरा’ या चित्रपटानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून झळकली.
त्या काळातील ही कहाणी आजही चाहत्यांना ९० च्या दशकातील ग्लॅमर आणि गॉसिपच्या दुनियेत नेते.




