‘तो’ फोन येताच केला आयुष्याचा शेवट; भारतीय महिला खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल…

Indian Jiu-Jitsu player Rohini Kalam | आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुजित्सू खेळाडू आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षक रोहिणी कलम (वय ३५) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील देवासमध्ये ही घटना घडली आहे. अर्जुन नगर राधागंज येथील राहत्या घरी रोहिणी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नेमकं काय घडलं?
आष्टा येथील एका खासगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक असलेल्या रोहिणी यांनी रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या वडिलांसोबत आणि बहिणींसोबत चहा-नाश्ता केला. त्यानंतर फोनवर बोलत त्या आपल्या खोलीत गेल्या आणि आणि पंख्याला दोरी लावून घेत त्यांनी टोकाचं पाऊल उचलले.
तर रोहिणीची आई आणि भाऊ खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेले होते आणि रविवारी संध्याकाळी परतणार होते. घटनेच्या एक दिवस आधी सकाळी रोहिणीने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. मात्र बराच वेळ रोहिणी बाहेर न आल्याने त्यांची बहीण रोशनी आणि कुटुंबातील इतरांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला देखील धक्का बसला आहे. Indian Jiu-Jitsu player Rohini Kalam |
दरम्यान, रोहिणीचे वडील महेश कलम यांनी सांगितले की, ती शाळेतील आपल्या नोकरीमुळे त्रस्त होती आणि अलीकडेच झालेल्या शस्त्रक्रियेनंतरही तणावात होती.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग
रोहिणीने 2007 मध्ये आपल्या क्रीडा कारकिर्दीला सुरुवात केली होती. 18 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता, ज्यामध्ये चार रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण आठ पदके जिंकली होती. मागील वर्षी तिने अबू धाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युजित्सु स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्या ज्युजित्सु संघाच्या महासचिवही होत्या. बर्मिंघममध्ये आयोजित जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या त्या एकमेव हिंदुस्थानी खेळाडू होत्या. Indian Jiu-Jitsu player Rohini Kalam |
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे. रोहिणीचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे आणि तिची खोली सील करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे क्रीडा विश्व आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. Indian Jiu-Jitsu player Rohini Kalam |
हेही वाचा:
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार राजकीय घराण्याची सून; थाटामाटात पार पडला साखरपुडा





