‘या कोणत्या स्टेप्स?’; अजय देवगण आणि मृणाल ठाकुर ट्रोल; नेटकऱ्यांनी कोरिओग्राफरलाही सुनावले

Ajay Devgn Troll | अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. नुकतेच या सिनेमातील ‘पहला तू’ हे गाणं रिलीज झाले. मात्र या गाण्यातील अजय आणि मृणालच्या डान्स स्टेप्सवर टीका केली जात आहे.
या गाण्यात ‘पेहला तू, दुजा तू, तिजा तू, चौथा तू’, अशी एक ओळ आहे. यावर हे दोघे त्यांच्या हाताच्या बोटांनी हुक स्टेप करताना पाहायला मिळतात. परंतु, या गाण्यातील कोरिओग्राफी प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी अजय देवगण व गाण्याच्या कोरिओग्राफरला ट्रोल केल्याचं पाहायला मिळतं आहे.
हे खूप विनोदी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. शरीराची फारशी हालचाल न करता फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन ते एक दोन तीन चार अशा प्रकारे बोटांची हालचाल करत आहेत. मात्र त्यांच्या डान्सची नेटकरी खिल्ली उडवत आहेत. Ajay Devgn Troll |
View this post on Instagram
‘नवीन स्टेप आली’, ‘इतकी अवघड स्टेप कशी केली?’, ‘या कोणत्या स्टेप्स आहेत. शरीराची अजिबात हालचाल नाही.’ ”हा हुशार कोरिओग्राफर कोण आहे?’ ‘कोण आहे हा टॅलेंटेड कोरिओग्राफर?’, ‘काय आहे हे?’,’अजयला डान्ससाठी फक्त हाताची बोटंच पुरेशी आहेत’ अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. अजय देवगणला नृत्य करायला आवडत नाही. त्याच्या इतर चित्रपटातील सहकलाकारांनी हे अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे, त्यामुळे त्याच्या गाण्यांचे हुक स्टेप्स खूप सोपे असतात.
दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट येत्या २४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात संजय दत्त, नीरु बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत यांचीही भूमिका आहे. यापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग ‘सन ऑफ सरदार’ २०१२ साली प्रदर्शित झाला होता, ज्यात अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा पाहायला मिळाली होती.
हेही वाचा:
ट्रम्पची ब्रिक्स देशांना पुन्हा धमकी ; म्हणाले,’लवकरच १०% अतिरिक्त कर…’





